जव्हार प्रतिनिधी | संदीप साळवे
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुका म्हटलं कि रोजगारासाठी होणार स्थलांतर डोळ्या समोर येते. तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा, खोमारपाडा येथील शिक्षक बाबू चांगदेव मोरे यांनी कमाल केली आहे. विध्यार्थ्याचे पालकच रोजगारासाठी स्थळातर करत असल्याने विध्यार्थीही स्थळांतरीत होत होते. याचा परीणाम पट संख्येवर होत होता. परंतु बाबु चांगदेव मोरे यांनी हे स्थलांतर रोखण्यासाठी व विध्यार्थ्यांना शेती विषयक आवड निर्माण व्हावी या साठी पाड्या-पाड्यातील पालकांना शेती विषयक मार्गदर्शन करून विविध पिके घेण्यास भाग पाडले व विध्यार्थ्याचे स्थळांतर थांबवण्यास तसेच विध्यार्थ्याचा पालकांना रोजगाराचे साधण मिळवून दिले.
बाबु मोरे या शिक्षकाची सन 2013 साली जि. प. प्रा. शाळा, खोमारपाडा येथे बदली झाली. ही शाळा तेव्हा 1 ली ते पाच वर्ग व पट संख्या 88 होती. ते जेव्हा शाळेत हजर झाले तेव्हा लोकांची भात शेतीची कामे जवळजवळ पुर्ण होत आली होती. पालक कामाच्या शोधात बाहेर गावी जाण्याचा तो काळ. पालक बाहेर कामाला जातात हे बरं होत कारण त्यांचाही पोटापाण्याचा प्रश्न होता. पण पालकांबरोबर शाळेत शिकणारी मुलं ही त्याच्याबरोबर जायची. शासनाने स्थलांतरित होऊन गेलेल्या किंवा आलेल्या मुलांची शिक्षणाची सोय केली आहे. पण नविन शाळा, नविन शिक्षक, मुले, वातावरण, त्या ठिकाची परिस्थिती, इ.शी जुळवून घेतांना मुलांचा बराच काळ निघून जातो व याचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर होतो. त्यावेळी 2013 साली या शाळेतील 16 ते 17 मुले पालकांबरोबर स्थलातरित होवून जायची. जे प्रमाण खूप जास्त होते. आणि हे प्रत्येक वर्षी होत होतं.
दरम्यच्या काळात या शिक्षकाने पाड्यावरील शाळाबाह्या मुलांचा कसून शोध घेवून 8 ते 10 मुलं शाळेत दाखल करून घेतली. खूप विचारांती या शिक्षकांने स्थलांतरीत होवून जाणाऱ्या मुलांना थांबविण्याचा मार्ग शोधला. आणि तो मार्ग होता शेती. या शाळेत जागा कमी असतांनाही आद्रक, बटाटे, मिरची, रताळे, इ.पिकाची प्लँस्टीक टबमध्ये लागवड करत हे गुरुजी विध्यार्थ्याना शेती विषयक आवड निर्माण करत होते. शाळेच्या समोर अर्धा गुंटा पडीक जागा होती. ती मुलांच्या मदतीने कुदळ, फावडे, यांच्या मदतीने साफ केली व त्यामध्ये मेथी, पालक, टोमँटो, कांदा, कोथिंबीर इ. शालेय पोषण आहारात उपयोगी पडतील अशा पिकांची मुलांच्या मदतीने लागवड केली. याचे तीन उद्देश होते. पहिला महत्वाचा म्हणजे मुलांना ताज्या भाज्या खायला मिळाव्यात, दुसरा म्हणजे पालकांना प्रेरित करणे आणि तिसरा म्हणजे मुलांना शेतीविषयक माहिती प्रत्यक्ष कृतीतून शिकविणे. मुलांची मेहनत व गुरुजीचे मार्गदर्शन यांच्या जोरावर हा प्रयोग खूप यशस्वी झाला. मुलांनी 3.5 महिने भाज्या खाल्ल्या, कांदे ही चांगले आले. ते ही मुलांनी 6 महिने खाल्ले. 2016 साली गणपती सुट्ट्यापुर्वी शाळेत पालकांची एक मिटींग घेतली. या मिटींगसाठी 35 ते 40 पालक उपस्थित होते. त्या नंतर शाळेतील प्रोजेक्टरवर पालकांना काही शेतीविषयक व्हिडीओ दाखविले. त्यांनी गुरुजीवर विश्वास ठेवून शेती करण्याचे ठरविले. त्या वर्षी गवार, कांदा, वांगी, दुधी, हरबरे, कलिंगड, काकडी, भेंडी, इ. पिकांची लागवड केली. लागवड केल्यावर शाळा सुटल्यावर किंवा कधी सुट्टीच्या दिवशी शेतावर पालकांना या शिक्षकाने वेळोवेळी मार्गदर्शन केले. पालकांना पिकापासून पैसा मिळू लागला होता. त्यांच्यामध्ये विश्वासही निर्माण होत होता. या प्रकल्पातून प्रत्येक शेतकर्याला बाहेर जावून काम करण्यापेक्षा जास्त पैसे मिळाले होते. त्या वर्षापासून या शाळेचा स्थलांतर प्रमाण 0 झाले.
या प्रयत्नाना अक्षरधारा फाउंडेशन-मुंबई यांनी आणखी बळ आणण्याचे काम केले. शेजारचे, फणसीपाडा, लयनीपाडा, मुसळपाडा, ठाकरपाडा व खडकीपाडा येथील शेतकर्यांचा एक गट बनवून मिरची, गवार, मेथी, वांगे, कारले, दुधी, डांगर, पालक, टोमँटो, कोबी, काकडी व जवळजवळ 35 टन कांद्याचे उत्पादन घेऊन पालकांना कोरोनासारख्या आजाराच्या काळातही उत्पन्नाचे साधन मिळवून दिले. 18 कुटुंब जे कामाच्या शोधात बाहेर जायची त्यांना आशेचा किरण दाखविणाऱ्या तसेच त्यांना आर्थिक पठबळ अक्षरधारा फाउंडेशनने दिले. या सर्व प्रयोगात बाबु मोरे हे शिक्षक दिवाळीसारख्या सुट्टीत गावी न जाता पाड्यातच राहून कांद्याचे रोप स्वत: तयार केली व दिवाळी त्यांच्यामध्येच साजरी केली. मुलांच्या शैक्षणिक व शरिरीक विकासासाठी सुह्रद फाउंडेशनसारखी संस्थाही या शिक्षकाच्या मदतीने शाळेत खूप चांगले काम करत आहे. या प्रकल्पात किरण गहला शेतकऱ्याने स्वत:चे शेत व पाणी कांद्याचे रोप तयार करण्यासाठी विनामुल्य दिले.
त्याच्या या कामात
केंद्रप्रमुख शंकर हडबाळ, गट शिक्षण अधिकारी भगवान मोकाशी, तसेच गटविकास अधिकारी राजेंद्रकुमार खताळ, सहाय्यक गट विकास अधिकारी ईश्वर पवार यांनी सहकार्य केले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.