व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

Credit Score झिरो असेल तर कर्ज कसं मिळवायचं? काय आहेत अटी?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मित्रानो, दैनंदिन जीवनातील गरजा भागवताना अनेकांना तारेवरची कसरत करावी लागते. कधी कधी आर्थिक अडचणींमुळे आपल्याला बँकेकडून कर्ज (Loan) काढावं लागत. परंतु कर्ज मंजूर होणं काय सोपं नसत. कर्ज मिळवण्यासाठी बँकेच्या अनेक अटी तुम्हाला पूर्ण कराव्या लागतात. यामध्ये महत्त्वाचा ठरतो तो म्हणजे तुमचा सिबिल स्कोर (CIBIL Score) .. सिबिल स्कोर चांगला असेल तर कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होतो मात्र जर सिबिल स्कोर खराब असेल तर मात्र कर्ज मिळवण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. पण जर एखाद्याने यापूर्वी कधीच कोणते कर्ज घेतले नसेल म्हणजेच त्याचा क्रेडिट स्कोर (Credit Score) झिरो असेल तर त्याला कर्ज मिळेल का? असा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल.

तर मित्रांनो, समजा तुम्ही कधीच कर्ज घेतलं नसेल आणि प्रथमच कर्ज घेणार असाल म्हणजेच तुमचा क्रेडिट स्कोर झिरो असेल तर काही प्रकरणामध्ये तुम्हाला कर्ज मिळू शकते मात्र यासाठी तुम्हाला अधिक व्याजदर मोजावा लागतो. तुमच्या सॅलरी स्लिपनुसार मग तुम्ही कर्जासाठी पात्र आहात की नाही हे बँक ठरवते. तुमचा पगार ठीकठाक असेल तर बँक तुमचे कर्ज मंजूर करु शकते, पण यामध्ये एकतर तुम्हाला कर्जाची रक्कम कमी मिळेल किंवा तुम्हाला जास्तीचे व्याज द्यावे लागण्याची शक्यता असते .

प्रथमच कर्ज मिळवण्यासाठी किती पगार असावा –

तुमचा क्रेडिट स्कोर झिरो असलेला व्यक्ती पगारदार असेल कर्ज मंजुरीसाठी कमीत कमी १३ हजार रुपये तरी त्याला पगार असावा. तसेच तर तुम्ही व्यावसायिक असाल तर दर महिन्याला तुमचे उत्पन्न 15,000 रुपयांपेक्षा जास्त असावे. आणि ही रक्कम प्रत्येक महिन्याला तुमच्या बँक अकाउंट वर पडायला हवी. तसेच तुमचे वय 21 ते 57 वर्षे दरम्यान असावे. या अटी पूर्ण केल्यास तुम्हाला झिरो क्रेडिट स्कोर वरही बँकेकडून कर्ज मिळू शकतं.