जिल्हा परिषद इमारत भूमीपूजनासाठी वॉटरप्रूफ मंडप

0
76
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी म्हणजेच 17 सप्टेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन होणार आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू असून, वीस हजार चौरस फुटांचा वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात येणार आहे. या सभामंडपात एक हजार लोकांच्या बैठकीची व्यवस्था आणि 20 बाय 50 फुटांचे भव्य स्टेज उभारण्यात येत आहे. यामध्ये कोरूना नियमानुसार आसन व्यवस्था करण्यात येत असून, स्टेज उभारणीसाठी 40 जणांची टीम दिवस-रात्र काम करत आहे.

जिल्हा परिषदेच्या नव्या इमारतीच्या नियोजित जागेवरील पाडापाडी युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आली आहे. त्या ठिकाणी सपाटीकरण करून भूमिपूजन सोहळ्याचा मंडप उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे. सभापती किशोर बलांडे यांनी सांगितले की राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वेळ मिळाली असून, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची वेळ मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पावसाची शक्यता लक्षात घेऊन वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात येत आहे.

मंडप उभारणारे रखमाजी जाधव यांनी सांगितले की, मंडप उभारणीचे काम 16 सप्टेंबर पर्यंत पूर्ण करावे लागणार आहे. समारंभाला कमी दिवस उरल्याने सध्या चाळीस मजूर रात्रंदिवस काम करीत आहेत. या ठिकाणी कोरूना च्या नियमानुसार शासन व्यवस्था केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here