जालना | अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील जायकवाडी वसाहतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे कुलूप उघडून अज्ञात चोरटयांनी शाळेतील 50 हजाराचे साहित्य चोरून नेल्याची घटना आज सकाळी शाळा उघडण्याच्या वेळी शिक्षकास निदर्शनास आल्याने गोंदी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
वडीगोद्री येथील जायकवाडी वसाहतीत इयत्ता 1 ते 4 पर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असून दिवाळी निमित्त शाळेला 15 सुट्या होत्या.आज शाळेच्या सुट्टया संपल्याने शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद शाळा उघडण्यासाठी आले असता शाळेच्या कार्यालयाचे चोरटयांनी बनावट चावी तयार करून कुलूप उघडे दिसले.
त्यावेळी कार्यालयातील काही साहित्य गायब दिसले असता शिक्षकांनी टेबलाच्या ड्राँव्हरमध्ये अन्य वर्गाच्या चाव्या गायब होत्या.चोरटयांनी सर्व वर्ग खोलीतील साहित्य गायब केले होते.शाळेतील एलईडी बल्प किंमत 15 हजार रुपये तसेच 4 हजार रुपये किंमतीचे फँन,काँम्युटरचे प्रिंटर 12 हजाराचे,क्रिकेट साहित्य 15 हजार रुपायांचे व 6 खुर्च्या,मेगाफोन व साऊंड सिस्टम यासह अनेक साहित्य 50हजार रुपये चोरटयांनी लंपास केले आहे.
चोरीच्या घटनेची माहिती गोंदी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांनी शाळेला भेट देवून शाळेतील साहित्य चोरणाऱ्यांना चोरटयांना जेरबंद करण्याचे आश्वासन यावेळी दिले.