सोलापूर प्रतिनिधी । सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचा नुकताच कोरोना पॉसिटीव्ह अहवाल आला. त्यांच्या पाठोपाठ सोलापूर झेडपीचे मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचा ही कोरोना अहवाल पॉसिटीव्ह आला आहे. चार महिन्यांपूर्वीच स्वामी यांनी सोलापूर झेडपीचा पदभार घेतला होता. सध्या त्यांच्यावर घरीच उपचार सुरु आहेत. आवश्यकतेनुसार त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.
त्यांना सोमवार सकाळ पासून कणकण होती, तरीही त्यांनी जिल्हा परिषद मध्ये काही महत्वाच्या बैठकांना हजेरी लावली, मंगळवारी सकाळी ही एक व्हिडीओ कॉन्फरन्सिंग असल्याने ते कार्यालयात आले होते मात्र त्रास होऊ लागल्याने ते लगेच आपल्या निवासस्थानी गेले त्यांनी लगेच आपली कोरोनाची टेस्ट केली.
कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी लगेच आपले कार्यालयीन सहकारी यांना कोरोनाची चाचणी करण्यास सांगितले. त्यांचे स्वीय सहाय्यक, बॉडीगार्ड पोलीस, वाहन चालक यांनी आपली चाचणी केली मात्र सर्वजण निगेटिव निघाले. पदभार स्वीकारल्यानंतर ग्रामीण भागातील कोरोना नियंत्रणाच्या मोहिमेत स्वामी हे सक्रिय सहभागी होते.