ATM कार्डला सुरक्षित ठेवण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स! सावधगिरी बाळगा आणि नुकसान टाळा!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | एटीएम कार्ड ही आजच्या काळातील एक गरजेची वस्तू झाली आहे. एटीएम मशिन मधून पैसे काढणे खूप सोपे आणि शारीरिक कष्ट वाचवणारे आहे. पण अनेक ठिकाणी यामार्फत फ्रॉड केले जाते. वापरकर्त्याला नुकसान झाल्यानंतर याबाबत माहिती मिळते. त्यावेळी वेळ हातातून गेलेली असते. पण वेळीच सावध झाले आणि काही खबरदारी घेतली तर, यामध्ये होणाऱ्या फ्रॉड पासून वाचू शकता. आपल्या एटीएम कार्डला सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही काही टिप्स देत आहोत. त्या टिपच्या मदतीने आपले कार्ड सुरक्षित ठेवून सुरक्षित ट्रांजेक्शन करू शकतो.

डेबिट कार्ड व एटीएम कार्डचा डेटा आजच्या काळामध्ये सुरक्षित ठेवणे हे एक चॅलेंजच आहे. एटीएममध्ये एटीएम कार्ड सर्वांसमोर वापरणे ते वापरताना दक्षता न घेणे. सोबतच आपल्या कार्डची डिटेल इतरांना सांगणे. याचे नुकसान भविष्यामध्ये सोसावे लागते. यासाठी, वेळीच सावध झालेले चांगले. त्यामुळे काही महत्त्वाच्या टिप्स आहेत, जशा कोणत्याही वेबसाईटवर आपल्या कार्डची माहिती सेव करून ठेवू नका. बऱ्याच वेळा लोक माहिती टाकायची वेळ येऊ नये म्हणून, ही माहिती फील करून ठेवत असतात. यामुळे आपले कार्ड खूप अन-सेफ होऊन जाते. आपल्या कार्डचे फोटो काढून ठेवू नका. आथवा पोस्ट करू नका. पब्लिक आणि फ्री वाय- फाय वापरताना कार्डवरून पेमेंट करू नका. सुरक्षित आणि विश्वसनीय वेबसाईट वरूनच आपल्याकडचे ट्रांजेक्शन करा. यासोबतच, कार्ड ट्रांजेक्शन केल्यानंतर ब्राउझर आणि केश मेमरी डिलीट करा. सध्या वाय -फाय कार्ड जास्त चर्चेमध्ये आहेत. अशा कार्डला पेमेंट करण्यासाठी ओटीपी आणि पॅनची गरज नसते. यामार्फत फसवणूक होणे खूप सोपे होते.

ऑनलाइन बँकिंग, नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग अशा सुविधा वापरून झाल्यानंतर आपले अकाउंट लॉग आउट करणे गरजेचे आहे. ग्राहकांना आपले कार्ड आणि वॉलेट्स पिन बदलत राहणे गरजेचे आहे. लॅपटॉप अथवा डेस्कटॉपवर नेहमी अँटीव्हायरसचा वापर करावा. स्मार्ट फोन वापरत असाल तर, ॲपला गरजेपुरतेच एक्सेस द्यावे. एसएमएस गॅलरी, कॉल, कॉन्टॅक्ट एक्सेस मागणारे ॲप गरजेचे नसेल तर इन्स्टॉल करू नये. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, नेहमी लक्षात ठेवा की बँक, क्रेडिट कार्ड अथवा संस्था कधीही आपल्या कार्डची माहिती विचारात नाहीत. जसे सिविवी कोड, एक्सपायरी डेट, ओटीपी असे कधीच मागत नाहीत. आणि त्यासाठी कॉलही करत नाही. तुम्हाला तसा कॉल आला तर ही माहिती कधीच शेअर करू नका.

You might also like