करमाळ्यात मतदानाला गालबोट, संजय शिंदेंच्या कार्यकर्त्यांकडून मारहाणीचा प्रकार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी । अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे बंडखोर उमेदवार नारायण पाटील यांच्या कार्यकर्त्यांना जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी घडली आहे. या मारहाणीत नारायण पाटलांचा कार्यकर्ता गंभीर जखमी झाला आहे. डोक्याला जबर मार बसल्याने कार्यकर्ता रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला उपचारासाठी तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

माढ्यातील दहिवली भागात रावसाहेब जगताप, बाळु जगताप, बापुराव जगताप, संतोष देवकर, पिंटु जगताप, औंदुबर खोचरे, गणेश जगताप, अनिल जगताप, सुभाष जगताप या कार्यकर्त्यांना जबर मारहाण व चाकूने वार करून गंभीर जखमी करण्यात आले आहे. जखमींवर टेंभुर्णी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आमदार नारायण पाटील हे तात्काळ दहीवली येथे पोहचले आहेत

शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार नारायण पाटील यांनी संजय शिंदे यांच्याकडे या मारहाणीबाबत संशयाची सुई दाखवली आहे. या ठिकाणी तिकीट न मिळाल्याने अपक्ष राहिलेल्यांची भाऊगर्दी आहेच, शिवाय पक्षांतर करून सेनेचं तिकीट मिळवलेल्या रश्मी बागल यासुद्धा या मतदारसंघात आहेत. स्थानिक पोलीस प्रशासन या घटनेची अधिक चौकशी करत आहेत.

Leave a Comment