राष्ट्रवादीच्या पूर्व प्रदेशाध्यक्षाचं ठरलं ! १३ सप्टेंबरला करणार शिवसेनेत प्रवेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आपल्या समर्थकांसह १३ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन पैकी एक आमदार शिवसेनेत प्रवेश करत असल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे.

युतीच्या इतिहासात प्रथमच शिवसेना होणार लहान भाऊ ; जागा वाटपाच्या या फॉर्म्युल्यावर होणार शिक्का मोर्तब

भास्कर जाधव यांनी सोमवारी चिपळुणात आपल्या समर्थकांची बैठक घेतली. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेना प्रवेशासाठी १३ सप्टेंबरचा मुहूर्त काढल्याची घोषणा केली. उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत जाधव यांचाशिवसेना प्रवेश होणार आहे. राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्यावर आपला राग नाही आणि आपण त्यांच्याविरोधात काहीही बोलणार नाही. जर उध्दव ठाकरे यांनी संधी दिली तर गुहागर मतदार संघातून निवडणूक लढवू, असे वक्तव्य जाधव यांनी यावेळी केले.

काँग्रेस सोबत निवडणूक लढवायची की नाही या बाबत प्रकाश आंबेडकरांनी केले अंतिम विधान

गुहागर आणि चिपळूणमधील राष्ट्रवादीचे काही पंचायत समिती सदस्य, गुहागर तालुक्यातील ७३ सरपंच आपल्यासोबत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती जाधव यांनी यावेळी बोलताना दिली. आधीच खिळखिळी झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे या पक्षबदलामुळे आणखी नुकसान होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला हा मोठा फटका बसला आहे.