अबब !!! मंडपासाठी २,६२० गणेशोत्सव मंडळांचे अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी । गणेशोत्सवाला अवघे दोन आठवडे उरले असताना अद्याप केवळ २ हजार ६२० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीच अर्ज केले आहेत. यापैकी एक हजार पाच मंडळांना मंडपासाठी परवानगी मिळाली आहे. अर्ज करण्याची मुदत २४ आॅगस्टपर्यंत वाढविण्यात आल्याने गणेशोत्सव मंडळांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबईत सुमारे १२ हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. महापालिकेच्या विविध विभागांकडून परवानगी घेण्याची प्रक्रिया किचकट असल्याने पालिका प्रशासनाने आॅनलाइन अर्ज मागविले आहेत. आतापर्यंत केवळ १५ टक्केच मंडळांनी महापालिकेकडे अर्ज केला आहे. मंडपाची परवानगी घेण्यापूर्वी बहुतांशी मंडळांनी गणेशमूर्ती आणण्यास सुरुवात केली आहे. मंडपासाठी अर्ज करण्याची मुदत १९ आॅगस्ट रोजी संपुष्टात येत आहे़. ८० टक्के मंडळांनी अद्याप अर्ज केला नसल्याने मुदतवाढ देण्याची मागणी गणेशोत्सव समन्वय समितीने केली होती. ही मागणी मान्य करीत पालिका प्रशासनाने २४ आॅगस्ट रोजी सायंकाळी ५.३० पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान ”www.mcgm.gov.in ” या वेब पोर्टलवर मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये अर्ज करण्याची सिविधा उपलब्ध आहे. पालिकेच्या पोर्टलवरील > आॅनलाइन सेवा > परिरक्षण > गणपती/ नवरात्रीच्या टॅबखालील Ganapati/Navratri Mandap Application मध्ये नमूद विविध लिंकनुसार अर्ज सादर करावा असे आवाहन मनपा कडून करण्यात आले आहे.

Leave a Comment