औरंगाबाद प्रतिनिधी | सिल्लोड मतदारसंघातुन माजी आमदार तथा काँग्रेस चे बंडखोर नेते अब्दुल सत्तार यांना शिनसेनेने उमेंदवारी दिली असुन पक्ष प्रमुख उध्दव ठाकरेंनी सत्तार यांना ‘एबी’ फॉर्म दिलाय. त्यामुळ सिल्लोड मधून सुरु असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाल्याचं समजत आहे.
पुर्वी भाजपा शिवसेना युतीमध्ये ही जागा भाजपाकडे होती. काँग्रेस सोडून माजी मंत्री तथा आ.अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सत्तार यांना भाजपात प्रवेश करायचा होता. मात्र भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या भाजपा प्रवेशाला विरोध केला होता. त्यामूळे सत्तार यांनी सेनेची वाट धरली. मागील अनेक वर्षात राजकारणात असलेले सत्तार यावेळी सेने कडून निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत.
मात्र येणा-या दिवसांत त्यांना भाजपा कडून साथ मिळते का हे पाहणे महत्वाचे आहे. तसेच त्यांची मतदार संघावर असलेली पकड लक्षात घेता तसा उमेदवार सेनेकडे नसल्याने सत्तार यांना उमेदवारी देण्यात आल्याचे समजते. मात्र या निवडणुकीत बंडखोर कशा पद्धतीने सत्तार यांना ब्रेक लावतात हे पहावे लागेल.