सांगली प्रतिनिधी | सकलेण मुलाणी
शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांचे व काँग्रेसचे राज्य सरचिटणीस तथा जिल्हा परिषद सदस्य सत्यजित देशमुख यांचे सूत जुळणार आहे. येत्या विधानसभेला देशमुख यांना भाजपाची उमेदवारी देऊन आमदार नाईक यांना विधानपरिषद दिली जाणार असल्याच्या चर्चानी सध्या तालुक्यात खळबळ उडवून दिली आहे. या चर्चेमुळे भाजपातील व काँग्रेसमधील कार्यकर्त्यांची द्विधा अवस्था निदर्शनास येत आहे.
शिराळा विधानसभा मतदारसंघ हा शिराळा तालुका आणि वाळवा तालुका या दोन्ही तालुक्यांचा समावेश असणारा आहे. शिराळा विधानसभा मतदारसंघांमध्ये शिराळा तालुक्यातील १०५ गावांचा समावेश होत असून वाळवा तालुक्यातील ४८ गावांचा समावेश होतो आहे. शिराळा तालुक्यातील १०५ गावातील एकूण मतदान जवळपास एक लाख वीस हजारच्या दरम्यान आहे, तर वाळवा तालुक्यातील ४८ गावातील मतदार जवळपास एक लाख ४० हजारांच्या दरम्यान आहे. त्यामुळे शिराळा विधानसभा मतदारसंघात वाळवा तालुक्यातील ४८ गावातील मतदारांचा वरचष्मा सहाजिकच राहणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीकरिता शिराळा विधानसभा मतदारसंघांमध्ये बहुरंगी लढत होण्याची शक्यता गेल्या अनेक दिवसापासून वर्तविली जात आहे. सध्या चर्चेत असणाऱ्या उमेदवारांमध्ये भाजपाचे विद्यमान आमदार शिवाजीराव नाईक, माजी आमदार मानसिंगराव नाईक, जिल्हा परिषद सदस्य सत्यजित देशमुख, शिवसेनेचे अभिजीत पाटील, तर सम्राट महाडिक हेही शिराळा विधानसभा निवडणूक लढण्याकरिता इच्छुक असल्याचे समजून येत आहे. एकंदरीत शिराळा विधानसभेकरिता ४८ गावातून उमेदवारी मागण्याचा हा पहिलाच प्रसंग असून या पहिल्या प्रसंगात चिकुर्डेचे अभिजीत पाटील व येलूर – पेठचे सम्राट महाडिक हे तालुक्यातील अग्रेसर ठरले आहेत.
राज्यासह देशात सध्या भाजप सरकार आहे. त्यामुळे आता सर्वत्र भाजपाचाच बोलबाला सुरू आहे. त्यातच भाजपा पक्षामध्ये पक्षप्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे भाजपाच्या गळ्याला कोण कोण लागतील हे काही सांगता येत नाही.
असे एकंदरीत चित्र भाजप पक्षाकडून रंगविले जात आहे. त्यातच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील हे दररोज प्रसारमाध्यमांच्या मधून काँग्रेस-राष्ट्रवादीतील काही मातब्बर आगामी काही दिवसातच भाजपमध्ये प्रवेश करतील असे सांगत सुटले आहेत. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या अनेक नेतेमंडळींच्याकडे कार्यकर्ते सुद्धा आपला नेता पक्ष सोडून भाजपमध्ये जातो की काय अशा शंकेच्या नजरेने पाहत असल्याचे दिसत आहेत.
सध्या अशाच स्वरूपाच्या खमंग चर्चा शिराळा नागभूमित रंगल्या आहेत. विद्यमान आमदार शिवाजीराव नाईक यांच्या सर्वच संस्था सध्या अडचणीतून मार्गक्रमण करत असल्याने आगामी विधानसभा निवडणूक त्यांच्याकरिता धोक्याची ठरेल असे अंदाज वर्तविले जाऊन शिवाजीराव नाईक हे विधानसभा निवडणूक न लढविता ते इतरांच्या पाठिंब्यासाठी, सहकार्यासाठी निवडणूक रिंगणात असतील. त्यांची अशी भूमिका राहावी याकरिता सध्या त्यांना भाजपाच्या चंद्रकांत दादा पाटील यांनी विधानपरिषदेचे आमदारकी देतो. संस्थाना सर्वतोपरी मदत करतो असे आश्वासन दिली असल्याचेही सध्या शिराळा वाळवा तालुक्यातील गावातून चर्चा सुरू आहेत.
सत्यजित देशमुख गेल्या अनेक वर्षापासून आमदार होण्याकरिता प्रयत्न करीत आहेत. काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी तिकीट मागण्याचाही प्रयत्न सुरू केला आहे. परंतु त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी कडून तिकीट नाकारले जाण्याची शक्यता असल्याने ते आता भाजपाचे कमळ हातात धरून विधानसभा निवडणूक लढविणार आहेत. त्यांना पाठिंबा व सहकार्य आमदार शिवाजीराव नाईक देणार आहेत. या सर्व गोष्टी घडवून आणण्यामध्ये चंद्रकांत दादा पाटील यांचे मोठे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे शिराळा विधानसभा मतदारसंघांमध्ये निश्चितपणे काँग्रेसच्या हातात कमळ येणार व सत्यजित देशमुख भाजपातून विधानसभा मतदारसंघ लढविणार अशा चर्चांना ऊत आला आहे.
गेली अनेक वर्ष आमदार म्हणून कार्यरत असणाऱ्या विद्यमान आमदार शिवाजीराव नाईक यांना विधान परिषदेची ऑफर देऊन त्यांचे चिरंजीव रणधीर नाईक यांनाही राजकीय भविष्य देण्यात येणार आहे. त्यासोबतच त्यांच्या सर्व संस्थाना पाठबळ दिले जाणार आहे. अशा सर्व चर्चांनी सध्या शिराळा व वाळवा तालुका झपाटलेला आहे. एकंदरीत आमदार शिवाजीराव नाईक यांचा विधानसभा व्हाया विधानपरिषद हा प्रवास भाजपातील कार्यकर्त्यांच्या करिता द्विधा अवस्था निर्माण करणारा ठरू लागला आहे. सध्यातरी या अशा स्वरूपाच्या चर्चा वा अंदाज सुरू आहेत. वास्तविक चित्र काय राहणार याबाबतीत मात्र येणारा काळच सांगेल.
नाईक, देशमुख गटाचे कार्यकर्ते सभ्रमांत
शिराळा विधानसभा मतदार संघातील काँग्रेसचे कार्यकर्ते व भाजपाचे कार्यकर्ते दोघेही पक्ष – पक्षांतर या गोष्टींना घेऊन संभ्रमात आहेत. या चर्चाच आहेत की वास्तवात तशा गोष्टी निर्माण होणार आहेत. हे कोणालाच काही कळेनासे झाल्याने काँग्रेसच्या व भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये संभ्रमाचे स्थिती नजरेस येत आहे.
हे पण वाचा –
देवेंद्र फडणवीस ‘या’ मतदार संघातून लढणार आगामी विधानसभा
बाजी पलटणे में देर नही लगती : धनंजय मुंडे
शिवेंद्रराजे, संग्राम जगताप राष्ट्रवादी सोडणार नाहीत : शरद पवार
आता सगळा हिशोब करणार चंद्रकांत पाटलांचे शरद पवारांना ओपन चालेंज
शरद पवारांनी केल्याल्या आरोपावर मुख्यमंत्री म्हणतात
पक्ष सोडण्याआधी चित्र वाघ मला भेटल्या होत्या : शरद पवार
‘मला फोडलेली माणसं नकोत, मला मनाने जिंकलेली माणसं पाहिजेत ‘ – उद्धव ठाकरे