ईव्हीएम नाही तर जनता विरोधकांना हरवते – फडणवीस

0
30
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर प्रतिनिधी | आमची यात्रा सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षांनीही यात्रा सुरू केल्या आहेत. परंतु त्याचा काही एक उपयोग होणार नाही. कारण १५ वर्षे सत्तेत असताना जनतेने त्यांची माजोरी अन मुजोरी पाहिली आहे. त्यामुळे जनता त्यांच्या जवळ जात नाही. हरले तर ईव्हीएममुळे असा आरोप ते करतात. परंतु ईव्हीएम त्यांना हरवत नसून जनता त्यांना हरवत असते, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावलाय.

सोमवारी सकाळी पाथर्डी येथे महाजनादेश यात्रेनिमित्त देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्ला चढविला. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री राम शिंदे, खासदार सुजय विखे, आमदार मोनिका राजळे, शिवाजीराव कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे, वैभव पिचड, सुरजीतसिंग ठाकूर, माजी खासदार दिलीप गांघी, माजी मंत्री बबनराव पाचपुते, नगराघ्यक्ष डॉ.मृत्युंजय गर्जे, माजी नगराघ्यक्ष अभय आव्हाड, भाजपचे तालुकाध्यक्ष माणिकराव खेडकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here