सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली आहे. उदयनराजे भोसले हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले आहेत. याआधी उदयनराजेंचे बंधू आमदार शिवेंद्रराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शिवेंद्रराजे भाजपमध्ये गेल्यामुळे उदयनराजे अस्वस्थ असल्याचं बोललं जात आहे.
शिवेंद्रराजे भोसले हे सत्तेसोबत गेले आहेत.सत्तेसोबत असल्यामुळे शिवेंद्रराजे हे सातऱ्यात आणखी मजबूत आणि सक्षम होतील, याची भीती आहे, त्यामुळे उदयनराजे भोसले हे पक्ष बदलण्याच्या विचारात आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
पूरग्रस्त भागात मदत कशी करायची याची चर्चा मुख्यमंत्री आणि उदयनराजे यांच्यात होईल. याचबरोबर राजकीय चर्चाही या दोघांमध्ये होईल, असं सांगितलं जात आहे. शिवेंद्रराजेंनी याआधीच पक्षात प्रवेश केल्यामुळे भाजप उदयनराजेंनाही पक्षात घेणार का? हा मुद्दा आहे. पण उदयनराजेंनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली तर राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडेल, त्यामुळे भाजप ही संधी सोडण्याची शक्यता कमी आहे.
उदयनराजे भोसले हे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असूनही त्यांनी उदयनराजेंनी त्यांचं स्वत:चं वेगळं अस्तित्व ठेवलं आहे. तसंच आपण पक्ष मानत नसल्याचंही त्यांनी अनेकवेळा सांगितलं.
विधानसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group Link – http://bit.ly/2MX7ZOF
WhatsApp Nambar – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra http://bit.ly/2YCtGur
पी.चिदंबरम यांचा जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला ; कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक
राज ठाकरेंना ईडीची नोटीस येणार हे मला आधीच माहित होतं : प्रकाश आंबेडकर
Breaking |राष्ट्रवादीला महाधक्का ; छगन भुजबळ शिवसेनेच्या वाटेवर
गोपीचंद पडळकर वंचितला ठोकणार रामराम ; या पक्षात करणार प्रवेश
विजय शिवतारेंना हृदयविकाराचा झटका