‘एकच जिद्द रिफायनरी रद्द’- विनायक राऊत

संग्रहित छायाचित्र
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

रत्नागिरी प्रतिनिधी। रत्नागिरी जिल्ह्यातील महाजनादेश यात्रे दरम्यान मुख्यमंत्र्यांनी नाणार प्रकल्प होऊ शकतो असे विधान केले होते. त्या विधानानंतर आज ‘नाणार रिफायनरी प्रकल्प’ विरोधी शेतकरी , मच्छिमार संघटनेची तारळ येथे सभा  झाली. खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी यांची उपस्थिती या सभेला उपस्थिती होती. यावेळी ‘आमचं नातं लाल मातीशी, मग आम्हाला रिफायनरी नको,  दलालांच्या दिखाव्याला मुख्यमंत्री बळी पडले तसेच शिवसेना स्थानिक जनतेसोबत आहे असा विश्वास आणि टीका खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना भाजपा  विरोधी भूमिका घेण्याच्या स्थितीत असल्याचे यावरून दिसून येत आहे.

यावेळी ‘एकच जिद्द रिफायनरी रद्द’ची खासदार विनायक राऊत याची व्यासपीठावरुन घोषणा केली. तसेच मुख्यमंत्र्यांना येथील जनतेचे मत जाणून घ्यायचे  असेल तर समोरासमोर येऊन चर्चेला बसण्याचे आव्हान सुद्धा खा. राऊत यांनी केले आहे. दरम्यान शिवसेनेच्या या भुमीकेचे पडसाद युतीवर होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर रिफायनरी प्रकल्पाचे थांबलेले कवीत्व पुन्हा विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर सुरु झाल्याने ही राजकीय खेळी असल्याचे जनतेतुन बोलले जात आहे. जे शिवसैनिक प्रकल्प समर्थनाची बाजू घेत आहेत त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई करणार असल्याचा इशारा देखील खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे.