टीम, HELLO महाराष्ट्र| आयएनएक्स मीडिया प्रकरणात अंतरिम जामीन फेटाळल्यानंतर पी. चिदंबरम यांना सीबीआयने बुधवारी रात्री उशिरा अटक केली आहे. जोरबाग येथील त्यांच्या निवासस्थानातू त्यांना अटक करण्यात आली. तत्पूर्वी २७ तासानंतर पी. चिदंबरम यांनी काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन त्यांची बाजू मांडली. त्यानंतर ते जोरबाग येथील निवासस्थानी पोहचले तेव्हा त्यांच्या निवास्थानी सीबीआयची टीम दाखल आधीच झालेली होती.. विशेष म्हणजे चिदंबरम यांना अटक करण्यासाठी १ तासांपासून सीबीआयचे अधिकारी चिदंबरम यांच्या घरात ठाण मांडून बसले.चिदंबरम यांच्या अटकेनंतर प्रथमच पी
चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबर यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. “केवळ 370 प्रकरणावरुन लोकांच लक्ष हटविण्यासाठी सरकारने माझ्या वडिलांना अटक आहे” असे कार्ती यावेळी म्हणाले. “काँग्रेस पक्षाची आणि पी चिंदंबरम यांची प्रतिमा मलिन करण्याचा सरकारचा डाव आहे. या प्रकरणाला विनाकारण मोठं बनविण्यात आलं आहे, ज्यामध्ये चिदंबरम यांचा काहीही संबंध नाही. मलाही सीबीआयने 4 ते 5 वेळा नोटीस बजावली होती. मी सीबीआयचा पाहुणाच बनलो होतो. तब्बल 10 ते 12 तास मी सातत्याने चौकशीला गेलो आहे. मात्र, अद्याप माझ्याविरुद्ध कुठलंही दोषारोपपत्र दाखल झालेलं नाही. त्यामुळे, आम्ही कायदेशीर आणि राजकीय मार्गाने आमचा लढा सुरूच ठेऊ” असे कार्ती चिदंबरम यांनी माध्यमांना सांगितले. चेन्नईवरुन दिल्लीला जाण्यापूर्वी कार्ती यांनी चेन्नई विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधला होता. दरम्यान, सीबीआयने पी चिदंबरम यांची कसून चौकशी करताना, आयएनएक्स मीडिया, पीटर मुखर्जी, इंद्राणी मुखर्जी यांच्याबद्दलही प्रश्न केले आहेत.