कोल्हापूर प्रतिनिधी। शहरातील हॉटेल व्यवस्थापकाला मारहाण करून लूटमार केल्याच्या संशयावरून एकाला चौकशीसाठी शहर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र, केवळ चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन असलेल्या या मुलाला करवीर पोलिसांनी मारहाण केल्याची घटना आता उघडकीस आली आहे. दीपक झुलू शेळके असे चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन हॉटेल कामगाराचे नाव असून झालेल्या मारहाणी त्याची प्रकृती अत्यवस्थ असल्याचा आरोप सदर मुलाच्या नातेवाईकांनी केला आहे.
या घटनेनंतर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. जखमी दीपक वर सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून करवीर ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप जखमी दीपकच्या नातेवाईकांनी केला आहे.
दरम्यान या घटनेमध्ये सीपीआर मध्ये दाखल केलेल्या दीपक याची प्रकृती सध्यातरी गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे जर उद्या त्याला काही झाले तर त्याची जबाबदारी कोण घेणार अशी विचारणा आता नातेवाईक करत आहेत.