कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सरकारच्यावतीने संचारबंदी लागू केली असताना मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या कोल्हापूर शहरातील 100 जणांवर शहरातील विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे संचारबंदी काळात घराबाहेर पडणारे उच्चभ्रू लोक असून त्यांनी पोलिसांनी त्यांना पकडल्या नंतर खोटी माहिती दिल्याचं देखील उघड झालंय.खोटी माहिती देणाऱ्यामध्ये डॉक्टर , वकील , प्राचार्य, उद्योजक ,शिक्षक यांचा समावेश आहे.
करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन आहे, माहिती आहे का? घराजवळ दुकान असताना दूध, भाजी खरेदीसाठी बाहेर का पडला?, तुम्हाला समाजाच्या आरोग्यापेक्षा स्वतःच्या आरोग्याची अधिक काळजी आहे का?, जबाबदारीचे भान आहे का?, असे धडाधड प्रश्न विचारत शहर पोलिस उप अधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी सकाळी मॉर्निग वॉकसाठी येणाऱ्यांची कानउघाडणी केली. टी. ए. बटालियन परिसरात सायकलिंग आणि फिरायला येणाऱ्यांची भंबेरी उडली. कारवाईत दोन डॉक्टरांचाही समावेश आहे. कारवाई केलेले व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने दिवसभर शहरात चर्चा सुरू होती.गेल्या दोन दिवसांपासून या कारवाईने वेग घेतला आहे.
या सर्वांवर शहरातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. उपअधीक्षक कट्टे यांनी सकाळी सहा वाजता उड्डाणपूल ते टी. ए. बटालियन, शिवाजी विद्यापीठ रोडवर फिरायला येणाऱ्यांचा प्रबोधनाचा तास घेऊन कारवाई केली. रोडवर सकाळी काहींना थांबवून चौकशी केली असता त्यांनी खोटी कारणे सांगितली. प्रत्येकाकडे कसून चौकशी केल्यानंतर सर्वांनी ‘आम्हाला माफ करा, चूक झाली, पुन्हा अशी चूक होणार नाही’ असे अधिकाऱ्यांसमोर कबूल केले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”