गणपतीला नैवद्य दाखवण्यासाठी अशा बनवा ‘खापरोळ्या’

0
107
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र | आपण गणेशोत्सवात बाप्पाला अनेक वेगवेगळ्या प्रकारचा नैवद्य दाखवत असतो. त्यामुळे आज आपण गणपतीसाठी जरा वेगळ्या प्रकारचा नैवद्य बनवायला शिकणार आहोत.

साहित्य –

२ वाट्या तांदूळ, १/२ वाटी उडीद डाळ, २ टे. स्पू. हरभरा डाळ, १ टी. स्पू. मेथी दाणे, थोडं मीठ, हळद, आणि तेल.

कृती-

1) तांदूळ, उडीद डाळ, हरभरा डाळ, मेथी दाणे  स्वच्छ धुवून एकत्र ५-६ तास पाण्यात भिजत घालावे.

2) मिक्सरमधून बारीक वाटून त्यात मीठ व हळद घालून मोठय़ा पातेल्यात घालून फुगण्यासाठी १०-१२ तास ठेवावं.

3) पीठ आंबून वर येईल. गॅसवर बिडाचा तवा ठेवून त्याला तेलाचा बोळा फिरवावा. तवा गरम झाल्यावर मिश्रण हलवून पळीभर टाकून पुरीच्या आकाराच्या खापरोळ्या काढाव्यात.

4) या खापरोळ्या नारळाच्या गूळ आणि वेलची घातलेल्या दुधाबरोबर ठेवून नैवेद्य दाखवावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here