चप्पल दाखवा, दगडफेक करा हे शिवसेनेचे जुने छंद, अमृता फडणवीस यांचे शिवसेनेला सडेतोड उत्तर

0
31
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : शिवसेनेच्या जोडे मारो आंदोलनाला अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरून उत्तर दिले आहे. या आंदोलनाचा समाचार अमृता फडणवीस यांनी या ट्विटवरून घेतला आहे. हम तो वो शक़्स हैं की धुप में भी निखर आएँगे असं अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत. चप्पल दाखवा, दगडफेक करा, हे शिवसेनेचे जुने छंद आहेत, अशी टीका करून त्यांनी शिवसेनेच्या जोडे मारो आंदोलनाचा व्हिडीओ ट्विट केला आहे. ट्विटमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांना टॅग केले आहे.

अमृता फडणवीस यांनी या आधी आडनाव ठाकरे असल्यामुळे कोणी ठाकरे होत नाही असा टोला उद्धव ठाकरे यांना लगावला होता.या ट्विटरद्वारे त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या शैलीचा दाखला दिला होता. अमृता फडणवीस यांच्या या ट्विटला जोडे मारो आंदोलन करून शिवसेनेच्या महिला कर्यकर्त्यांनी उत्तर दिले होते. अमृता फडणवीस या स्वतंत्र व्यक्तिमत्व आहेत, त्यांची मते ही त्यांनीच मांडलेली मते आहेत असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here