मुंबई : छत्रपती ऊदयन राजे यांचा सातारा येथे पराभव घडवून आणला. हा शिवरायाच्या वंशजांचा अपमान आहे. त्याबद्दल भाजपा शिवरायांच्या वंशजांची व महाराष्ट्राची माफी मागेल काय? असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी ट्विट करत हा प्रश्न विचारला आहे. त्यांनी म्हंटले की, छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे. छत्रपतींच्या प्रत्येक गादी विषयी आम्हाला आदर आहे. पण छत्रपती ऊदयन राजे यांचा सातारा येथे पराभव घडवून आणला. हा शिवरायांच्या वंशजांचा अपमान आहे. त्याबद्दल भाजपा शिवरायांच्या वंशजांची व महाराष्ट्राची माफी मागेल काय?
छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे..छत्रपतीचया प्रत्येक गादी विषयी आम्हाला आदर आहे.
पण छत्रपती ऊदयन राजे यांचा सातारा येथे पराभव घडवून आणला..हा शिवरायाच्या वंशजांचा अपमान आहे..त्या बद्दल भाजपा शिवरायांचया वंशजांची व महाराष्ट्राची माफी मागेल काय?— Sanjay Raut (@rautsanjay61) 15 January 2020
पुण्यात लोकमत पत्रकारिता २०२० पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात संजय राऊत यांची मुलाखत पत्रकार अतुल कुलकर्णी यांनी घेतली. त्यावेळेसही त्यांनी छत्रपती उदयनराजे यांना लक्ष्य केले होते. आता त्यांनी ट्विटरवरून उदयनराजेंच्या पराभवाआडून भाजपला लक्ष्य केले आहे.