नवी दिल्ली : देशातील पहिले’चीफ ऑफ डिफेंस स्टाफ’ (सीडीएस) यांचे नाव जाहीर झाले आहे. लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत हे देशातील पहिले सीडीएस म्हणून पदभार स्वीकारतील. सीडीएसला तीन सैन्यात ताळमेळ निर्माण करण्याची जबाबदारी देण्यात येईल. मंगळवारी जनरल बिपिन रावत लष्करप्रमुख पदावरून निवृत्त होणार आहेत.
सीडीएस हा एक फोर स्टार जनरल असेल आणि त्याचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल. वयाच्या 65 व्या वर्षापर्यंत सीडीएस पदावर कायम राहतील. पहिल्यांदा वयाची अट 62 अशी ठेवण्यात आली होती.
युद्धामध्ये सिंगल पॉईंट ऑर्डर देण्याच्या दृष्टीकोनातून सीडीएसची नियुक्ती देखील महत्त्वपूर्ण आहे. म्हणजेच तिन्ही सैन्याना समान आदेश जारी केला जाईल.कारगिल युद्धाच्या वेळी तीन सैन्यात समन्वयाची मोठी कमतरता असल्याचे समितीला आढळले. म्हणून सैन्याने समन्वय साधण्यासाठी मुख्य सुरक्षा बल आवश्यक आहे.