औरंगाबाद | डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अजब कारभाराने शिक्षण क्षेत्राला हादरा बसला आहे. मराठवाडा विद्यापीठाने चक्क दोन नापास विद्यार्थ्यांना पदवी बहाल केली आहे. तीन अथवा चार वर्षाचे विद्यापीठाचे पदवी शिक्षण पूर्ण केल्या नंतर त्या विद्यार्थ्यास पदवी प्रदान करण्यात येते. विद्यार्थी नापास झाल्यास त्यास सर्व विषयात पास झाल्यावरच पदवी करता अर्ज करता येतो. परंतु मराठवाडा विद्यापीठाने अजब कारभार केला आहे. नापास विद्यार्थ्यांनी पदवी करता अर्ज केला असता चक्क नापास झालेल्या विद्यार्थ्यांनाही विद्यापीठीय पदवी प्रदान केली आहे. या प्रकरणामुळे विद्यापीठाच्या प्रशासकीय कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.