… ‘त्या’ खेकड्याला तरी अटक करा – आमदार जितेंद्र आव्हाड

0
76
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी । तिवरे धरण फोडून ज्याने तेविस माणसे मारली , त्या खेकडयाला तरी राज्य शासनाने आता अटक करावी व मृत वा जखमी झालेल्या लोकांना व त्यांच्या नातेवाइकांना निदान न्याय तरी मिळवून द्यावा. असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.

“खेकड्यांनी पोखरल्यामुळे भगदाड पडले आणि तिवरे धरण फुटले” असा अजब दावा राज्याचे सन्माननीय जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी काल केला. प्रशासकीय व्यवस्थेच्या गलथान व असवेंदनशील कारभारामुळे घडलेल्या या दुर्घनेवर हळहळ व्यक्त होत असतांना मंत्री महोदयांच्या या विधानावर राज्यात सर्वत्र टिका होत आहे.

आव्हाड यांनी याच मुद्यावर सरकार वर टिका करत सरकारच्या अशा कारभारामुळे राज्याची संवेदनाशीलता नष्ट झाली आहे. आपल कुठे कोण मेले आहे , तर आपण सुतक पाळायचे..? याची जबाबदारी कोण घेणार…? कुठे गेला माझा पूर्वीचा संवेदनाशील महाराष्ट्र..? असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here