दीड वर्षाच्या मुलीसह महिलेची विहीरीत उडी घेऊन आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे

तासगावात दीड वर्षाच्या मुलीला सोबत घेवून विवाहितेने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. राजनाह तांडा, विजापूर येथील कामानिमित्त तासगाव येथील साठेनगर येथे राहण्यास आलेल्या आरती राठोड या महिलेने दीड वर्षाच्या अंजली राठोड या मुलगीसह विहरीत उडी घेवून आत्महत्या केली. याबाबत तासगाव पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

विजापूर येथील सचिन वालू राठोड हा कामानिमित्त दीड वर्षापासून तासगाव येथील साठेनगर येथे राहत आहे. त्याच्यासोबत आई, वडील, बहीण, भाऊ, पत्नी आणि मुलगी असा परिवार होता. सचिन पत्नी आरती सोबत रोज मुजरीस जात होता. दोन दिवसांपूर्वी कामावर जाण्यासाठी लवकर उठण्यावरून दोघांत वाद झाला होता. आज सकाळी कामावर जात असताना, तब्येत ठीक नसल्याने कामावर येणार नसल्याचे आरतीने पतील सचिनला सांगितले. त्यानंतर अकरा वाजण्याच्या सुमारास राहत असलेल्या ठिकाणाहून जवळच असलेल्या बायपास रस्त्यालगतच्या विहीरीत स्वत:च्या मुलीला सोबत घेवून विहीरीत उडी मारून आत्महत्या केली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दुपारी दीड वाजेपर्यंत दोन्ही मृतदेह हेल्पनाईन टीमच्या सहाय्याने विहीरीतून बाहेर काढण्यात आले. याबाबत तासगाव पोलिसांत नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक उमेश दंडिले करत आहेत.

 

Leave a Comment