पुणे | सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर आदी जिल्ह्याच्या पक्ष बांधणीसंबधी उद्धव ठाकरे यांनी आज पुण्यात बैठक घेतली होती. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत नाणारवर शिवसेनेची भुमिका काय? असा प्रश्न विचारला असता ‘आम्ही नानार कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही’ असे उद्धव ठाकरे यांनी जाहिर केले. ‘शिवसेना कोकणच्या माणसांना मृत्यूच्या जबड्यात लोटणार नाही’ असेही ठाकरे यावेळी म्हणाले.
पुण्यात शिवसेना कंकुवत आहे आणि मागील काळात माझे पुण्याकडे लक्ष नव्हते असे प्रामाणिकपणे ठाकरेंनी कबूल केले. पुण्यातून लोकसभेचा उमेदवार कोण असेल? असा सवाल करताच, ‘योग्य वेळ येताच योग्य व्यक्तीचे नाव जाहीर करू’ असे उद्धव यांनी सांगीतले. आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याची तयारी उद्धव ठाकरे करत असून त्याच अनुषंगाने त्यांच्या बैठकांना वेग आला आहे.