जालना प्रतिनिधी | राजकारणात सरपंच पदापासून केंद्रीय मंत्र्यांपर्यंत सगळी पदं भोगून झाली आहेत आता कोणतीही अपेक्षा राहिली नाही आहे. मात्र मुख्यमंत्री पदाबाबत पुढे विचार करणार असल्याचं म्हणत रावसाहेब दानवे यांनी आपली मुख्यमंत्री पदाबाबत सावध भूमिका घेत सूचक वक्तव्य केले. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नैतृत्वाखाली राज्यभर महाजानदेश यात्रा करण्यात आली होती. तेव्हा आगामी निवडणुकीत विजय मिळाल्यावर पुढील मुख्यमंत्री फडणवीसच होणार हे गृहीत असताना. दानवेंनी आपली मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
दरम्यान राजकारणातही आता मराठा समाजाला ओबीसीचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी करणार असल्याचं वक्तव्य केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी यावेळी केले. ओबीसी समाजानं आम्हाला शत्रू म्हणून बघू नये, आम्ही तुमचेच मित्र असून आम्हीही पुढच्या काळात राजकारणातही आम्हाला ओबीसीचा दर्जा द्या अशी मागणी करणार असल्याचे दानवे म्हणाले.
जालन्यात विकास महामंडळांवर नव नियुक्त झालेल्यांचा जालन्यात समस्त ओबीसी समाजाकडून दानवेंनाचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ओबीसी समाजाला संबोधित करत असताना ते बोलत होते. सोबतच दरम्यान येत्या १३ तारखेला राज्यात विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागणार असल्याची माहितीही रावसाहेब दानवे यांनी दिली.