नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख
सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणुकांमध्ये सध्या युतीकडे इनकमिंग चालू आहे. अशातच सिन्नरचे माजी आमदार कोकाटे यांनी आपली शरद पवारांवर असलेली निष्ठा सिध्द करत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
सरकार द्वेषाच्या भावनेने गुन्हे दाखल करत असून, जनतेला अशा प्रकारचे राजकारण अभिप्रेत नसल्याचे वक्तव्य कोकाटे यांनी केले आहे. सरकार द्वेषाच्या भावनेने गुन्हे दाखल करत असून, जनतेला अशा प्रकारचे राजकारण अभिप्रेत नसल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे. तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना व भाजपमध्ये कोणीही अभ्यासू नेता नसल्याचे ते म्हणाले आहेत.सरकारने आश्वासने दिल्यानंतरही अद्याप शेतकऱ्यांचे विम्याचे पैसे अडकले आहेत. युती सरकारने शेतकऱ्यांसाठी कोणतेही काम न केल्याची टीका माणिकराव कोकाटे यांनी केली. तसेच या विधानसभा निवडणुकीत आघडी सरकार सत्तेत येणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.सत्ताधाऱ्यांनी एकाही प्रश्नाला न्याय दिला नसल्याने जनतेच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष असल्याचे कोकाटे म्हणाले.
सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांचा मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश झाला. प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सिन्नर मतदारसंघातून राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे उमेदवार म्हणून कोकाटे यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे सिन्नर मतदारसंघात पुन्हा एकदा विद्यमान आमदार राजाभाऊ वाजे व माजी आमदार कोकाटे यांच्यात सामना रंगणार आहे.