लखनऊ | पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील अझमगड येथे भारतातील सर्वात लांब दृतगती महामार्गाची पायाभरणी केली. ३५४ कि.मी. लांबी असणारा हा महामार्ग लखनऊ ते गाजीपूर असा असणार आहे. पूर्वांचल दृतगती महामार्ग असे या महामार्गाला नाव देण्यात आले आहे.
महामार्गामुळे पूर्वेकडील वाहतूक जलद होण्यास मदत होणार आहे. लखनऊ ते गाजीपूर हे अंतर महामार्ग झाल्यानंतर ४ ते ५ तासात पार करणे शक्य होणार आहे. लखनऊ येथून सुरु होणारा हा महामार्ग फैजाबाद, अमेठी, आजमगढ, गाजीपूर आदी शहरांतून जाणार असून तो सहा पदरी असणार आहे. या दृतगती महामार्गाकरता साधारण १७ हजार कोटी इतका खर्च येणार आहे.