उस्मानाबाद प्रतिनिधी | अजित माळी
वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची आज कळंब येथे उस्मानाबाद मतदारसंघाचे उमेदवार धनंजय शिंगाडे यांच्या प्रचारार्थ सभा पार पडली. या सभेत प्रकाश आंबेडकर यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला. हे सरकार त्यांच्या विरोधात बोलनाऱ्यावर कारवाई करत आहे. जो विरोधात बोलतोय त्यांच्यावर देशद्रोहाची कारवाई करतायेत. मी सरकारला आव्हान करतो मला एकदा पकडूनच दाखवा मग मी कसे नाटकं करतो ते बघा, आशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला खुले आव्हान केलं आहे.
सध्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली कारवाई होत आहे. याला प्रतिउत्तर म्हणून प्रकाश आंबेडकरांनी सरकारला खुले आव्हान केले. तसेच बँकेत किती जणांचे पैसे आहेत असे विचारत पंधरा लाख तर येणार नाहीत पण हे सरकार जर ठेवलं तर तुमचे बँकेत जे पैसे आहेत ते ही जातील असाही टोला आंबेडकर यांनी यावेळी लगावला.