मुंबई प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष व माजी मंत्री सचिन अहीर यांनी आज मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
"मला फोडलेली माणसं नकोत, मला मनाने जिंकलेली माणसं पाहिजेत."
– शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे. pic.twitter.com/niYiVZJlEW— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) July 25, 2019
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांतील बहुतांश नेते सध्या आपआपलं राजकीय भवितव्य सुरक्षित करण्यात गुंतले आहेत. त्यामुळे सध्या अनेक नेते हे शक्य तितक्या लवकर पक्षांतर करण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत. या पक्षांतरामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस पक्षाला मोठा तोटा होणार आहे.
पक्षांतरामुळं शिवसेनेचं तसेच भाजपचे बळ राज्यात आणखीनच वाढणार असून येत्या निवडणुकीत राज्यात विरोधी पक्ष नामशेष होण्याच्या स्थितीत असेल. येत्या आठवड्यात पच्छिम महाराष्ट्रातील काही आणखीन बडे नेते पक्षांतर करण्याची जोरदार चर्चा आहे.
हे पण वाचा –
शरद पवारांसाठी ‘या’ १३ व्यक्ती आहेत खास; अजित पवारांचा समावेश नाही!
मराठा आरक्षणाच्या बाजूने लढणाऱ्या विनोद पाटलांना हा पक्ष बनवणार आमदार
लक्ष्मण मानेंनी केली नव्या राजकीय पक्षाची घोषणा ; काँग्रेससोबत आघाडी करण्याचे संकेत
या मतदारसंघातून चंद्रकांत खैरे विधानसभा निवडणूक लढणार !
आणि रोहित पवारांनी त्याच्या हट्टापायी सलूनमध्ये केली कटींग!
म्हणून सनी लिओनी कधीच पाहत नाही आपल्या आई-वडिलांचा फोटो
अजित पवार मोहिते पाटलांच्या पाठीशी ; घेतली मुख्यमंत्र्यांची भेट