मुंबई : युवा शिवसेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. आदित्य ठाकरे यांच्या मंत्रिमंडळ समावेशामुळे आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे पिता पुत्र मंत्रिमंडळात असणार आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पिता पुत्र एकाच मंत्रिमंडळात असण्याची ही पहिलीच वेळ आहे.
शपथ घेताना आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या आई रश्मी ठाकरे यांच्या नावाचाही उल्लेख केला. आदित्य ठाकरे यांना राज्यमंत्री पद मिळणार अशी चर्चा सुरु असताना आदित्य ठाकरे यांची थेट कॅबिनेट मंत्री पदी वर्णी लागली आहे. आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अदिती तटकरे या देखील पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून आल्या असून त्यांची देखील राज्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.
या मंत्रिमंडळ विस्तारात ३५ आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांच्यासह बच्चू कडू, प्राजक्त तनपुरे, विश्वजित कदम, अशोक चव्हाण, अजित पवार, दिलीप वळसे पाटील, अजित पवार या आमदारांना शपथ देण्यात आली आहे. २६ कॅबिनेट आणि १० राज्यमंत्र्यांना या मंत्रिमंडळ विस्तारात शपथ देण्यात आली आहे.
आदित्य ठाकरेंनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ
पहा व्हिडियो –