मॉब लिंचिंग महाराष्ट्रात सहन करणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । गेल्या ५ वर्षांपासून देशात ठिकठिकाणी मॉब लिंचिंग झालंय. त्यात आता आपल्याला जायचं नाही. पालघरमध्ये घडलेल्या घटनेबद्दल सरकार काय करतंय हे मला सांगायचंय मॉब लिंचिंग प्रकार अत्यंत वाईट आहे. महाराष्ट्रात असा प्रकार अजिबात सहन करणार नाही. मी वचन देतोय. पालघर घटनेला जबाबदार जे गुन्हेगार असतील त्यांनी हत्या केली आहे. ज्यांनी पोलिसांवर हल्ला केला आहे. तो एकही आरोपी सुटणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. आज मुख्यमंत्री ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पालघर प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली.

पालघरमध्ये घडलेली घटना लांछनास्पद आहे. गेल्या पाच वर्षातही आपल्या राज्यात मॉब लिंचिंग झालं. मुळात जिथे घडलं तो भाग पालघरपासून ११० किमी अंतरावर आहे. तिथं गैरसमजुतीनं साधूंवर हल्ला केला गेला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. हे काहीही घडवून आणण्यात आलेले नाही. असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

जे गाव अत्यंत दुर्गम भागात आहे तिथे काही मीटरवर दादरा नगर हवेली म्हणजे केंद्रशासित प्रदेशाची हद्द सुरु होते. तिथे त्यांना अडवलं गेलं, त्यानंतर त्यांना परत पाठवलं गेलं. तिथे गैरसमजुतीने त्यांच्यावर हल्ला झाला आणि दुर्दैवाने त्यांची हत्या झाली. येथील मॉब लिंचिंगची घटना ही दोन धर्मांमधला संघर्ष नाही. त्यामुळे याला धार्मिक रंग देऊन आग लावण्याचं काम करू नका. या प्रकरणाला वेगळं वळण देण्याचाही प्रयत्न करू नका, असा इशारा देतानाच पालघर घटनेतील ११० हल्लेखोरांना त्याच दिवशी अटक केली असून कुणालाही सोडलं जाणार नाही. या हल्लेखोरांना कठोर शिक्षा केली जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

WhatsApp करा आणि लिहा ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला“HelloNews”