यवतमाळ प्रतिनिधी । यवतमाळ तालुक्यातील गोंडबुरांडा येथील एका तरुण शेतकरी पुत्रानं काल रात्री साडे सात वाजताच्या दरम्यान शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नागोराव वामन खोके (२८) असे मृतक शेतकरी पुत्राचे नाव आहे. काल घरच्या मंडळींना शेतात जाऊन येतो असे सांगून नागोराव घरातून निघाला होता. संध्याकाळ होऊन तो घरी न परतल्याने घरच्या मंडळी त्याचा शोध घेत शेतात पोहचले असता. अत्यव्यस्थ परिस्थितीत नागोराव त्यांना पडलेला दिसला.
त्याला तात्काळ उपचारार्थ मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, पुढील उपचाराकरिता वणी येथे नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्याच्या मागे आई वडील, तीन बहिणी, पत्नी व ११ महिन्याचा मुलगा असा आप्त परिवार आहे. याबाबत मारेगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूचीनोंद घेतली असून, पुढील तपास मारेगाव पोलिस करीत आहे.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.