विशेष प्रतिनिधी | राज्यातील राजकिय वातावरण चांगलेच तापले असून कोणत्याही क्षणी राष्ट्रपती राजवट लागू शकते अशी चर्चा सुरु आहे. राज्यपाल यांनी राष्ट्रपतींकडे आपला अहवाल पाठवला असून राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंदर्भात शिफारस केल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सोमवारी संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले होते. राज्यपालांनी राष्ट्रवादीला मंगळवार संध्याकाळी ८:३० पर्यंतची वेळ दिली असून जर राष्ट्रवादी काँग्रेस सरकार स्थापन करण्यात अपयशी झाले तर राज्यात राष्ट्रपती लागवट लागू शकते असे बोलले जात आहे.
दरम्यान राज्यातील राजकीय घडामोडींवरुन सध्यातरी राष्ट्रवादी काँग्रेस सत्तास्थापनेसाठी अनुकुल भुमिका घेऊ शकेल अशी स्थिती नाही. राष्ट्रवादीने सत्तास्थापन करण्यात हार पत्करली तर राज्यात राष्ट्रपती लागवट लागणार आहे.