राज्यात CRPFच्या २० कंपन्या पाठवा; राज्य सरकारची केंद्राकडे मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्यातील पोलिसांच्या मदतीसाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या २० कंपन्या पाठवण्याची मागणी महाराष्ट्र सरकारनं केंद्राकडं केल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दिली. राज्यात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. जवळपास गेले दोन महिने राज्यातील पोलीस अहोरात्र कार्यरत आहेत. लॉकडाऊनचे नियम कठोरपणे राबवण्याची जबाबदारी सांभाळतानाच पोलिसांना कायदा व सुव्यवस्थेकडंही लक्ष द्यावं लागत आहे. त्यामुळं त्यांच्यावर अतिरिक्त ताण येत आहे. त्यातच राज्यात एक हजारांहून अधिक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कोरोनामुक्त झालेल्या पोलिसांना काही दिवस क्वारंटाइन राहावं लागणार आहे. शिवाय, अनेक पोलिसांना विश्रांतीची गरज आहे. तसेच येत्या २५ मे रोजी रमझान ईदही असल्यानं कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीनं केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) २० कंपन्या म्हणजेच २००० हजार सशस्त्र पोलिसांची मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्राकडे केली आहे.

“राज्यात राज्य राखीव पोलीस दलाचे ३२०० पोलीस कर्मचारी कार्यरत आहे. त्यांच्या मदतीने राज्यात सध्या पोलीस दल कार्यरत आहे. मात्र पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांना विश्रांतीची गरज आहे. त्यातच येत्या काळात रमाझान ईदचा सण आहे. त्यादृष्टीनं राज्यात कायदा सुव्यवस्था राखणं आवश्यक आहे. त्यामुळे राज्यात तातडीनं केंद्रीय सशस्त्र दलाचे २००० पोलीस म्हणजेच २० कंपन्या पाठवाव्यात,” अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्राकडे केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलीकडंच फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेला संबोधित केलं होतं. मुंबईत लष्कर बोलवलं जाणार नाही, असं त्यावेळी ते म्हणाले होते. मात्र, गरज पडल्यास पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी केंद्रीय पोलीस दलाची मदत घेतली जाईल, असंही त्यांनी सांगितलं होतं. त्यानुसार राज्यानं ही मागणी केली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात आत्तपार्यंत ८१९ पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. तर सात पोलिसांचा करोनाची लागण होऊन मृत्यू झाला असल्याची माहिती मंगळवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करुन दिली होती.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment