दिल्ली | खासदार सुप्रिया सुळे यांचा युनिसेफने पार्लमेंटिरियन अॅवार्ड फॉर चिल्ड्रेनने गौरव केला आहे. अपंग मुलांसाठी बारामती खासदार क्षेत्रात त्यांनी अत्यंत मोलाचे मदत कार्य केलं आहे. या कार्याची दखल घेत संयुक्त राष्ट्र संघाने त्यांना या पुरस्काराने सन्मानित केले. सुप्रिया सुळे म्हणतात, युनिसेफने दिलेला हा पुरस्कार त्यांनी बारामतीत कर्णबधिर मुलांसाठी केलेल्या मदत कार्याची पावती आहे.
केवळ आठ तासांत बारामतीतील चार हजार ८४६ कर्णबधिर मुलांना श्रवणयंत्र बसवण्याची किमया त्यांनी साधली. या उपक्रमासाठी अमेरिकेतील स्टार्की फाउन्डेशन,यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, टाटा ट्रस्ट आणि पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट या सेवाभावी संस्थांची मदत त्यांनी घेतली. त्यांच्या या कार्यक्रमाची दखल जागतिक स्तरावर घेण्यात आली असून इतक्या कमी वेळात चार हजारहून अधिक मुलांना श्रवणयंत्र बसवण्याच्या विक्रमाची नोंद ग्रिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली आहे.
सुप्रिया सुळेंना या आधीही संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसंच लोकसभेत सर्वाधीक प्रश्न विचारले म्हणून त्यांचे कौतूकही करण्यात आले आहे