हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । चहा म्हंटल किंवा नुसतं नाव जरी की काढलं तरी चहा पिण्याची तलफ होते भारतीय संस्कृतीत नव्या दिवसाची सुरुवात किंवा कोणत्याही कामाची सुरवात करताना चहा ने सुरुवात केली जाते. अगदी सर्वसामान्य माणूस सुद्धा दिवसातून कमीत कमी तीन ते चार वेळा चहा घेतो. चहा उत्पनात भारत हाअग्रेसर आहे. अनेक वेळेला चहा पिले कि फ्रेश असल्यासारखे वाटते. कोणत्याही कामाचा उत्साह हा चहा पिल्याने लवकर येतो. अनके वेळा चहा घेतल्याने शरीरातला थकवा निघून जतो. .जसे चहा पिण्याचे फायदे आहेत. त्याच पद्धतीने चहा पिण्याचे अनेक तोटे हि आहेत. आज तुम्हाला माहिती देणार आहोत कि चहा चे सेवन कश्या पद्धतीने करू नये.
–सकाळी सकाळी चहा पिण्याची सवय अनेक लोकांना असते अनेकांना बेड टी ची सुद्धा जास्त सवय असते. परंतु सकाळी सकाळी रिकाम्या पोटी चहा पिणे हे शरीरासाठी घातक आहे. चहा पिल्याने पित्ताचा त्रास होतो. तसेच भूक मरते.
— नेहमी नाष्टाला काहीतरी खाल्यानंतर चहा पिणे हे आरोग्यासाठी चांगली गोष्ट आहे.
— रात्रभर आपण शरीरासाठी कोणतेही पाणी पीत नाही त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या चहाऐवजी पाणी पिणे फायदेशीर असणार आहे. चहा पिण्याने डिहायड्रेशन ची समस्या निर्माण होते.
— एका पेक्षा अधिक वेळा चहा पिल्याने तुमची भूक मंदावते. तसेच त्यामध्ये जास्त प्रमाणात कॅफिन असते. त्याच्या सेवनाने झोपेवर परिणाम होऊन ऊर्जा हि मंदावते .
–भरपूर आधी बनवून ठेवलेला चहा तुम्ही पीत असाल तर तुम्ही चहा नाही तर विष पीत आहात. त्यामुळे ताजा चहा प्या.
–सारखे सारखे चहा पिल्याने तुमचे दात खराब दिसायला सुरुवात होते. त्यामुळे तुमचे व्यक्तीमहत्व खराब दिसू लागते.
–भरपूर आणि सारखे चहा पिल्याने लठ्ठपणाच्या समस्या निर्माण होतात.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’