Paytm संस्थापकाने Google वर केले आरोप! म्हणाले,”त्यांचा पेमेंटचा बिझनेस वाढवण्यासाठी ‘हे’ कृत्य केले”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शुक्रवारी गुगलने आपल्या प्ले स्टोअरमधून लोकप्रिय पेमेंट अॅप Paytm काढून टाकले. परंतु काही तासांनंतर ते पुन्हा रीस्टोर करण्यात आले. परंतु Paytm चे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी अमेरिकेची दिग्गज टेक कंपनी असलेल्या गुगलच्या या कृत्यावरुन संतापलेल्या गूगलने मक्तेदारीचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. त्यांचा असा आरोप आहे की, Google ने त्यांच्या पेमेंट बिझनेसचा विस्तार करण्यासाठी अधिकाराचा गैरवापर केला आहे आणि ग्राहकांना आकर्षित करण्याचा चुकीचा प्रयत्न केला आहे.

टाईम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार शर्मा म्हणाले की,” त्यांच्या कंपनीने काहीही चुकीचे केलेले नाही.” त्यांनी Paytm ला 30 कोटीहूनही अधिक ग्राहकांना आश्वासन दिले आहे की, त्यांचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत. नोटीस देण्यापूर्वी Google ने Paytm वर एकतर्फी कारवाई केली असा दावा त्यांनी केला. Google चे पेमेंट अॅप Google Pay आणि Paytm दरम्यान एक तीव्र स्पर्धा आहे.

गुगलने हे कारण सांगितले
शर्मा म्हणाले की,’ त्यांच्याकडे सामर्थ्य आहे आणि ते नक्कीच आम्हाला त्रास देत आहे. गुगलने स्वत: चा फायदा करून Paytm ला नवीन ग्राहक जोडण्यापासून रोखण्यासाठी हे कृत्य केलेले आहे.’ त्यांनी गुगलवर स्वत: च्या फायद्यासाठी हे काम केल्याचा आरोप केला. गुगलने प्ले स्टोअर वरून Paytm काढून टाकण्यामागील असे कारण दिले होते, ते त्यावर बेटिंग लावतात. परंतु शर्मा यांनी दावा केला आहे की, त्यांच्या अॅपने काहीही चुकीचे केले नाही.

97% स्मार्टफोन Google द्वारे नियंत्रित आहे
Google Android ऑपरेटिंग सिस्टमद्वारे देशातील 97% स्मार्टफोन इकोसिस्टम नियंत्रित करते. भारताचे कायदे गुगलवर लागू होत नाहीत, ते स्वतःचे धोरण चालवतात. गुगलचे मुख्यालय अमेरिकेतील माउंटन व्ह्यू येथे आहे. ते म्हणाले की,’Paytm मध्ये चीनचा अलिबाबा ग्रुप सर्वात मोठा गुंतवणूकदार आहे.’ शर्मा म्हणाले की, ‘सरकार आत्मनिर्भर भारतावर भर देत आहे आणि कोणत्याही परदेशी कंपनीमुळे घरगुती व्यवसायावर परिणाम तर होत नाही ना हे त्यांनी पाहायला हवे.’

ते म्हणाले, “जेव्हा आपण आत्मनिर्भर भारताबद्दल बोलत आहोत, तेव्हा आपण असा विचार करायला हवा की, भारतीय कंपन्या भारतीय कायद्यांद्वारे नियंत्रित व त्यांचे संरक्षण करतील किंवा इतर देशातील धोरण आपल्या ऑपरेशन्सवर नियंत्रण ठेवेल. अमेरिकेच्या सामर्थ्यशाली कंपन्या आपल्याला त्यांच्या पद्धतीने चालवू शकत नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment