लेह । लडाखमधल्या सैनिकांचं शौर्य हे त्यांना जिथं तैनात करण्यात आलंय तिथल्या पर्वतरागांपेक्षाही मोठं आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निमू येथे म्हटलं आहे. आज अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाख येथील निमू भागात दौरा केला. लेहमधील नीमूला भेट दिल्यानंतर रुग्णालयात जात जखमी जवानांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी जवानांना संबोधित केले. गलवान खोऱ्यात चीन आणि भारताच्या सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीनंतर देशभरात चीनविरोधात एक रोष निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते आहे.
भारतीय जवानांनी संपूर्ण जगाला आपहे साहस दाखवले असून संपूर्ण देश भारतीय सैनिकांपुढे आदरपू्र्वक नतमस्तक आहे, अशा शब्दांत गौरव करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनला खडे बोल सुनावले आहेत. आज विस्तारवादाचे युग संपले असून आता विकासवादाचे युग आले आहे, असा शब्दांत मोदी यांनी चीनला इशारा दिला आहे. संपूर्ण लडाख हा भारताचा आत्मसन्मान आहे, असे महत्त्वाचे विधानही पंतप्रधान मोदी यांनी सैनिकांना संबोधित करताना केले आहे.
Your courage is higher than the heights where you are posted today: Prime Minister Narendra Modi addressing soldiers in Ladakh pic.twitter.com/pLSpPsz45e
— ANI (@ANI) July 3, 2020
आज संपूर्ण देशाचील जनता आपल्यापुढे म्हणजेच आपल्या देशाच्या सैनिकांपुढे आदरपूर्वक नतमस्तक होत नमन करत आहेत. आज प्रत्येक भारतीयाची छाती तुमचे शौर्य आणि पराक्रमामुळे फुगलेली आहे. १४ कोअरच्या शौर्याचे किस्से सगळीकडे पसरले आहेत. संपूर्ण जगाने तुमचे अदम्य साहस पाहिले आहे. आपल्या शौर्यगाथा घराघरात दुमदुमत आहे. भारताच्या शत्रूंनी तुमची आगही पाहिली आहे आणि तुमचा रागही पाहिलेला आहे, असे मोदी सैनिकांना उद्देशून म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”