हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । लहान मुलं एकमेकांशी खेळत असतात त्यावेळी सर्वात जास्त कौतुक हे सगळ्या मुलांचे केले जात नाही. त्यातील जी मुलं दिसायला स्मार्ट आहेत किंवा शरीराने बलाढ्य आहेत. त्याचे कौतुक हे जास्त प्रमाणात पाहायला मिळते. पण त्याच्या शरीराचे असणारे वजन सुद्धा एक प्रकारची आई वडिलांसाठी डोकेदुखी आहे. भविष्यात या मुलांना खूप त्रास सहन करावा लागतो. मधुमेह तसेच हृदयरोग यासारखे आजार लहान वयातच मुलांना निर्माण होतात.
लठ्ठपणाचे कोणते दुष्परिणाम आहेत हे जाणून घेऊया
-जी मुले पाच ते दहा वयापर्यंत लठ्ठ राहतात. ती मुले आपला किशोर वयात सुद्धा तशीच राहतात. त्या मुलांना प्रौढांग वयात सुद्धा लठ्ठपणाचा सामना करावा लागतो.
-लठ्ठपणा येण्याचे प्रमाण हे मुलींमध्ये आणि मुलांमध्ये सारख्या प्रमाणात आहे.
-खाण्यापिण्याच्या खूप वाईट सवयीमुळे लठ्ठपणा हा जास्त वाढतो.
-लठ्ठ मुलींमध्ये वयाच्या अगोदर पाळी येण्याचे प्रमाण जास्त असते.
-लठ्ठ मुलींना नको असलेल्या ठिकाणी केस वाढायला सुरुवात होते.
-अनेक वेळा लठ्ठ मुलांचे शरीर योग्य रित्या वाढत नाही. त्याच्या दाढीमध्ये वाढ होत नाही.
-मुलाची मुलींच्या छातीसारखी वाढ होण्यास सुरुवात होते.
- वजनाचा परिणाम हा हाडांवर होतो. त्यामुळे शरीराची मोठ्या प्रमाणात झीज होते. हाडे ठिसूळ होतात.
-
तसेच या मुलांमध्ये नकारात्मकता वाढते
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’