लॉकडाऊनचे पालन करा, अन्यथा दिसता क्षणी गोळ्या घालाव्या लागतील- चंद्रेशेखर राव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात २१ दिवस लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊन असतानाही सोमवार आणि मंगळवारी लोक बाहेर आल्याचे पाहून तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रेशेखर राव हे कमालीचे नाराज झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री चंद्रेशेखर राव यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. “नागरिक घराबाहेर पडल्यास त्यांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देऊ,” असा स्पष्ट इशारा तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी दिला आहे. “मी नागरिकांना विनंती करतो की अशी वेळ येऊ देऊ नका,” असंही ते म्हणाले. अमेरिकेत तर लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी लष्कराला पाचारण करावे लागले आहे, याकडेही राव यांनी लोकांचे लक्ष वेधले आहे.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना मुख्यमंत्री राव यांनी हे वक्तव्य केले आहे. तेलंगणमध्ये जर जनतेने लॉकडाऊनच्या आदेशाचे उल्लंघन केले, तर मला २४ तासांसाठी संचारबंदी जाहीर करावी लागेल, असे राव म्हणाले. सरकारला गोळी मारण्याची वेळ येईल असे जनतेने वागू नये असे आवाहनही त्यांनी केले.

जनतेने जर तशी पाळी आणली तर मग सरकारकडे गोळी मारण्याशिवाय कोणताही पर्याय राहणार नाही, असे ते म्हणाले. लोकांनी रस्त्यावर येऊ नये यासाठी पेट्रोलपंप बंद करण्याबरोबरच लष्कराचीही मदत घेण्याचा विचार सरकार करत असल्याचे राव म्हणाले. रात्री ७ ते सकाळी ६ वाजेपर्यंत ही संचारबंदी असेल आणि संध्याकाळी ६ वाजताच सर्व दुकाने बंद व्हायला हवीत असेही राव म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

हे पण वाचा –

गुड न्यूज! महाराष्ट्रातील पहिल्या करोनाग्रस्ताला डिस्चार्ज

एक महिला जिच्यामुळे संपूर्ण देशात पसरला कोरोना व्हायरस

कोरोनाची लागण झालेल्या गर्भवती महिलेच्या मुलासही होऊ शकतो संसर्ग ? जाणून घ्या

‘खरंच…कोरोना विषाणू हवेतून पसरत आहे का? पहा काय म्हणतंय WHO…

सावधान : शरीरात ही ३ लक्षणे दिसल्यास समजून घ्या की आपण कोरोना विषाणूने संक्रमित आहात, जाणून घ्या

 

Leave a Comment