बुलढाणा प्रतिनिधी | बुलढाणा जिल्ह्यातील शेंदी गावात ३० ऑगस्ट रोजी कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी झाला असून परिसरातील काही गावात तब्बल १ तासाहून अधिक वेळ पाऊस बरसला. या पावसामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. लोणार तालुक्यातील ही ८ गावात हा कृत्रिम पाऊस पडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या भागातही विमानाने घिरट्या घातल्याचे नागरिक सांगत आहेत.
सिंदखेडराजा आणि देऊळगावराजा तालूक्यात दरवर्षी पेक्षा अल्प पाऊस झाल्याने नदी , नाले , जलयुक्त शिवारातील बंधारे, तलाव, धरणे कोरडीच असून भविष्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. दुष्काळाचा सामना करतांना शेतकरी हतबल झाले आहेत. जुन, जूलै महिन्यात केवळ रिमझीम पावसाच्या भरवश्यावर शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. त्यावर शेतीही बहरली. परंतू गेल्या १ महिन्यापासून पावसान चांगलीच दडी मारली होती. आकाशात काळेकुट्ट ढग जमा होत होते. परंतू ते हवेच्या झोकात पुढे निघू जात असत मराठवाड्यात कृत्रीम पाऊस पाडण्यासाठी औरंगाबाद इथं रडार बसविण्यात आले होते.
मराठवाड्याला लागून असलेल्या सिंदखेड राजा, लोणार तालुक्यालाही दुष्काळाची झळ बसलीये. या भागात वार्षिक सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस पडलाय. त्यामुळ या भागात कृत्रिम पाऊस पाडण्यात यावा, अशी मागणी जोर धरत होती. त्यासंदर्भात आ. डॉ. शशिकांत खेडेकर यांनी कृषीमंत्री अनिल बोंडे यांच्याकडे मागणी केली होती. त्यासाठी त्यांची आ. डॉ. खेडकरांनी प्रत्यक्ष भेटही घेतली होती. ३० जुलै रोजी याबाबतचे पत्रही त्यांना सादर केले होते