कोल्हापूर प्रतिनिधी, सतेज औंधकर : माजी खा. उदयनराजे यांना छत्रपती शिवाजीराजे यांचे वंशज असल्याचे पुरावे मागणाऱ्या संजय राऊत यांच्या वक्तव्याचा शिरोळ तालुका भाजपतर्फे शिरोळ येथे निषेध व्यक्त करण्यात आला.शिरोळ येथील छत्रपती शिवाजी चौकात सकाळी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. उदयनराजे भोसले हे छत्रपती शिवाजीराजे यांचे वंशज असल्याचे पुरावे मागणाऱ्या संजय राऊत यांच्या प्रतिमेस जोडे मारून निषध व्यक्त केला. राऊत यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.
यावेळी भाजपचे शिरोळ तालुकाध्यक्ष व जि.प. सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर आणि पृथ्वीराज यादव म्हणाले, उदयनराजे भोसले हे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट साळावे वंशज आहेत. हे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे. सध्या ते कोणत्याही पक्षात असोत पण छत्रपतीच्या एखाद्या वंशजाला त्यांच्या रक्ताच्या नात्यावरून भाष्य करणे म्हणजे छत्रपतीच्या कुळाला डिवचण्यासारखे आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान आहे. शब्दांची हेराफेरी करून वक्त्यव्य करायचे आणि पुन्हा त्यावर झाकन ठेवायचा प्रयत्न करायचा ही आकस निती महाराष्ट्रातील जनता कधीच सहन करणार नाही.राऊत यांची भाषा मराठी माणसाच्या अस्मितेला धक्का देणारी आहे. त्यामुळे राऊत यांनी. मराठी माणसाबरोबर उदयनराजे भोसले यांची जाहीर माफी मागावी. अशी मागणी करण्यात आली
यावेळी नगरसेवक इम्राण आत्तार , श्रीवर्धन माने देशमुख, उदय डांगे, दादा कोळी, गजानन संकपाळ, विजय आरगे, पंडीत काळे, प्रदिप भोसले, डॉ.आविंद माने, पिंटू शेख, उल्हास पाटील, पिंटू फल्ले, संभाजी भोसले, रवि शहापूरे ,दानलिंग चौगुले, जयपाल माणगावे, अतुल मडीवाळ यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.