परभणी प्रतिनिधी, गजानन घुंबरे – सत्तेत आलेल्या महाविकास आघाडीने सरसकट कर्जमाफी म्हणून दोन लाख रुपयांपर्यंत केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करत परभणीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या अध्यादेशाच्या प्रतींची होळी करत आंदोलन केले.
अध्यादेशाची स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून होळी
निवडणुकीपूर्वी सरसकट कर्जमाफीचे दिलेले आश्वासन सरकारने न पाळता शेतकर्यांची घोर फसवणूक केल्याचा आरोप करत, परभणी मध्ये आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्य शासनाने काढलेल्या कर्जमाफी योजनेच्या अध्यादेशाची होळी करत आंदोलन केलं .यावेळी राज्य शासनाच्या विरोधामध्ये आंदोलकांनी घोषणाबाजी केली व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करत सरसकट कर्जमाफी द्यावी अशी यावेळी मागणी केली आहे .
शेतकरी कर्जमाफी अध्यादेशाची परभणीमध्ये होळी; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन #Hellomaharahtra@CMOMaharashtra pic.twitter.com/naz2dKiPwO
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) December 28, 2019
२ लाखापेक्षा जास्त कर्ज असलेले शेतकरी अपात्र
हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 1 एप्रिल 2015 ते सप्टेंबर 2019 पर्यंत थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफी ची घोषणा केली होती. परंतु या योजनेतून 2015 पूर्वी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना वगळण्यात आले आहे. त्याचबरोबर २ लाखापेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीसाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.