संग्राम जगताप शरद पवारांची साथ सोडणार का ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर प्रतिनिधी | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची गळती सुरूच आहे. आतापर्यंत पक्षाच्या अनेक बड्या नेत्यांनी भाजाप आणि शिवसेनेत प्रवेश केलाय . आता अहमदनगरचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते संग्राम जगताप हे देखील शरद पवारांची साथ सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. जगताप भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे .

संग्राम जगताप हे अहमदनगरचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आहेत. शरद पवार यांनी त्यांना अहमदनगर मतदासंघातून लोकसभेची उमेदवारी देखील दिली होती. मात्र आता जगताप यांच्या सगळ्या बॅनरवरून राष्ट्रवादीचे चिन्ह असलेले ‘घड्याळ’ गायब झालंय. ते आपल्या बॅनरवर राष्ट्रवादीचं नाव देखील वापरत नसल्याचं समोर आलंय. यामुळं राजकीय वर्तुळात उलट -सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

संग्राम जगताप या वेळी राजकीय विश्रांती घेण्याच्या विचारात असल्याचे सांगण्यात येते . केडगाव प्रकरणातून सहीसलामत बाहेर पडण्याचे मुख्य उद्दिष्ट त्यांनी समोर ठेवले असून, त्यासाठी भाजपमध्ये प्रवेश करून पाच वर्षे थांबणे व नंतर पुन्हा आमदारकीच्या राजकारणात पुनरागमन करण्याचा त्यांचा विचार असल्याचं बोललं जातं आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी विधानसभेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच आताही कॉंग्रेस आणि भाजपचे अनेक नेते भाजप आणि सेनेच्या वाटेवर आहेत. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अडचणी वाढणार आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप –सेना युतीची ताकद वाढत आहे. तर काँग्रेस -राष्ट्रवादी कमकुवत होताना दिसत आहे.

Leave a Comment