सभेत कुत्रा घुसला अन.. पवारांनी उडवली सेनेची खिल्ली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

उस्मानाबाद प्रतिनिधी। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राज्यभर दौरा करत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा शरद पवार हे उस्मानाबाद मध्ये आहेत. या ठिकाणी सुरु असलेल्या सभेत कुत्रा घुसला अन् त्यानंतर पवारांनी जे वक्तव्य केल त्या  वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

उस्मानाबादेत सभा सुरु असताना शरद पवार जेव्हा सभेला संबोधित करत होते. तेव्हा सभेच्या ठिकाणी कुठून तरी कुत्रा आला. त्यावेळी पवार यांनी लगेच कुत्र्याकडे हात करत ‘शिवसेनेची लोकं आले काय की’ असा उपरोधिक टोला लगावला आणि सभा मंडपात एकच हशा पिकला.

तसेच सभेत बोलतांना पवारांनी सरकारला चांगलं धारेवर धरलं. ते म्हणाले की, राज्यात सोळा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. मात्र, धनदांडग्यांना मदत करणाऱ्या सरकारला शेतकऱ्यांबद्दल आस्था नाही. शेती न कळणाऱ्या सरकारला उपाययोजना करता येणार नाहीत. आघाडी सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे शेतकऱ्यांसह सामान्यांच्या हिताची जपणूक करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीच्या हातात सत्ता द्या, असे आवाहन पवार यांनी सभेत केले.

Leave a Comment