मुंबई प्रतिनिधी | ३० जून हा सुप्रिया सुळे यांचा वाढदिवस आज शरद पवार यांच्या निवासस्थानी अत्यंत सध्या पध्द्तीने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला फक्त पवार कुटुंबीयच उपस्थित होते. सुप्रिया सुळे यांचे घरातील महिलांनी औक्षण करून अभिष्टचिंतन केले आणि वाढदिवसाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला शरद पवार आवर्जून उपस्थित होते. तसेच सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे हे देखील यावेळी उपस्थित होते.
सुप्रिया सुळे यांचे औक्षण करण्यास अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार समोर आल्या तेव्हा सुप्रिया सुळे यांनी त्यांना प्रेमळपणे वहिनी अशी प्रेमळ हाक मारली. तसेच औक्षण करून झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचे पाय पकडून आशीर्वाद देखील घेतले. या कौटुंबिक वाढदिवसाच्या दरम्यान सर्व कुटूंबातील सदस्यांनी एकमेकांशी संवाद साधून अगदी खेळमेळीच्या वातावरणात वाढदिवस साजरा केला. सर्वात शेवटी सुप्रिया सुळे यांच्या मातोश्री प्रतिभा पवार यांनी सुप्रिया सुळे यांचे औक्षण केले त्यानंतर सर्वांनी फोटो काढून वाढदिवस यादगार बनवला.
सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त एकत्र आलेल्या पवार कुटुंबाने जुन्या आठवणी जाग्या करून मनमोकळ्या गप्पा मारल्या. नेत्यांचे मोठ मोठे वाढदिवस साजरे करण्याची शैली सुप्रिया सुळे यांची मोडीत काढत साधेपणाने केलेला वाढदिवस सर्वांसाठी एक आदर्श उदाहरण आहे.