तब्बल २.४ लाख लिटर दुध रेल्वेने दिल्लीला रवाना, कोरोनामुळे राजधानी हैराण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । २६ मार्च दक्षिण मध्य रेल्वेने गुरुवारी आंध्र प्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यातील रेनिगुंटा ते दिल्लीकडे जाणारी विशेष ट्रेन लॉकऑडनच्या दृष्टीने आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी २.४० लाख लिटर दुधासह नेली.

या विशेष रेल्वेतील सहा टँकरमध्ये दूध असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. ते म्हणाले की ४०,००० ते ४४,६६० लिटर दूध, दरमहा ८० टँकर रेनीगुंटाहून दिल्लीला साप्ताहिक व दैनिक एक्स्प्रेस गाड्यांद्वारे पाठविले जातात.

दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सी.एच. राकेश यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व प्रवासी गाड्या देशव्यापी लॉकडाऊन अंतर्गत बंद ठेवण्यात आल्या ज्यामुळे काही दिवस दुधाची वाहतूक प्रभावित झाली,”

ते म्हणाले, “ही अत्यावश्यक वस्तू पुरवण्याची गरज लक्षात घेऊन दक्षिण पश्चिम रेल्वेला विशेषत: रेनिगुंटा ते नवी दिल्ली या मार्गावर दुधाची टँकर ट्रेन चालविण्यास विशेष परवानगी मिळाली.राकेश म्हणाले की ही विशेष ट्रेन शक्यतो लवकरात लवकर हजरत निजामुद्दीनला जाण्यासाठी ताशी ११० किमी वेगाने धावेल.