Tuesday, March 21, 2023

अकरावी प्रवेश सीईटीसाठी औरंगाबाद विभागातून 1 लाख 10 हजार अर्ज

- Advertisement -

औरंगाबाद | राज्य सरकारने यावर्षी अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटी घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार राज्य मंडळामार्फत 21 ऑगस्टला राज्यभरात ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याचे नियोजन आहे. सामायिक प्रवेश परीक्षेसाठी औरंगाबाद विभागातून 1 लाख 10 हजार 168 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

कोरोनामुळे दहावीची परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापन द्वारे निकाल जाहीर झाला. विभागाचा निकाल 99.96 टक्के जाहीर झाला. यातच राज्य शासनाने यंदा अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटी घेण्याचा निर्णय घेतला. नोंदणीसाठी 20 जुलैपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली. मात्र संकेतस्थळाला तांत्रिक अडचणी येऊ लागल्याने अर्ज प्रक्रिया 21 जुलै पासून काही दिवसासाठी बंद ठेवून सुरू करण्यात आली.पुन्हा मुदतवाढ करण्यात आली.

- Advertisement -

यातच यंदा निकालाचा टक्का वाढल्याने नामांकित महाविद्यालयांमधील अकरावी प्रवेशासाठी स्पर्धा लागली आहे. 21 ऑगस्टला ऑफलाइन प्रवेश परीक्षा होणार आहे. परीक्षा ऐच्छिक असली तरी या परीक्षेच्या गुणवत्तेवरच पुढील प्रवेशासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यानंतर रिक्त जागांवर सिटी न दिलेल्यांना अंतर्गत मूल्यमापन यांच्या गुणांवर प्रवेश देण्यात येणार आहे. दरम्यान औरंगाबाद विभागातील 1 लाख 12 हजार 39 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. तर 711 विद्यार्थ्यानी अपूर्ण अर्ज भरले. 1 लाख 10 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज पूर्ण भरून सबमिट केले आहेत.