सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात शनिवारी रात्री उशिरा आलेल्या कोरोना तपासणीत रिपोर्टमध्ये 1 हजार 117 जण बाधित आढळले आहेत. कोरोना बाधिताचा आकडा दिवसेंन दिवस वाढताना दिसत आहे. कोरोनाचा पाॅझिटीव्ह रेट 22 टक्क्यांवर गेल्याने चितेंचे वातावरण कायम असून ते वाढताना दिसत आहे.
गेल्या चोवीस तासात सातारा जिल्ह्यात 5 हजार 79 लोकांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 1 हजार 117 लोक बाधित आढळून आले आहेत. आजच्या अहवालात पाॅझिटीव्ह रेट 22 टक्के आला आहे. शनिवारी जिल्ह्यात 20 जणांना विविध रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात सध्यस्थितीत 3 हजार 676 जण उपचार्थ आहेत.
कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला आज एक वर्ष पूर्ण….
गेल्या वर्षी आजच्या दिवशी कोरोना लस देण्यास सुरवात करण्यात आली. कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला आज एक वर्ष पूर्ण झालंय. 16 जानेवारी 2021 पासून देशात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. 138 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात वर्षभरात 157 कोटी डोस देण्यात आलेत. आता कोरोनाची तिसरी लाट आलेली असताना लसीकरण महत्त्वाची भूमिका पार पडत असल्याचे पाहायला मिळतंय. येत्या काळात बूस्टर डोसचं आव्हान प्रशासनापुढे आहे. लसीकरणाच्या वर्षपूर्तीनिमित्त आज विशेष टपाल तिकीट जारी करण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यात पहिला डोस 93% पूर्ण तर दूसरा डोस 67% पूर्ण झाला आहे.15 ते 18 वयोगटासाठीचे लसीकरणाचा पहिला डोस ही मोठ्या प्रमाणात दिला गेला आहे.